जून पूर्वीच नवीन पहिलीच्या मुलांची पूर्वतयारी..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 11, 2024 11:12 AM
views 247  views

देवगड : शैक्षणिक वर्ष जून ला सुरु झाल्यावर इयत्ता १ च्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यास सुरवात केली जाते पण यावर्षी कुणकेश्वर नं. १ या शाळेत २०२४-२५ शैक्षणिक वर्षातील इयत्ता पहिली चा वर्ग १ एप्रिल पासूनच सुरु करण्यात आला आहे .त्यामुळे जून पूर्वीच या नवीन पहिलीच्या मुलांची पूर्वतयारी करून घेतली जात आहे .पालकवर्गातूनही या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे .नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्याचे शाळेकडून जोरदार स्वागत करण्यात आले .रोज काही वेळ अभ्यास ,थोडा वेळ मनोरंजन , गंमतीदार खेळ घेऊन विद्यार्थ्यांना शाळेविषयी कशी गोडी लागेल यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत .

शाळेत पहिलं पाऊल ठेवणारी नवागत बालके मोठ्या आनंदात अध्ययनात रममाण होत आहेत ,शाळेने पुरविलेले लेखनसाहित्याचा नवीन बालके पुरेपूर वापर करीत आहेत .चित्रात रंग भरत.अंकाचे गाणी म्हणत .उत्साहाने प्रत्येक गोष्टीत विद्यार्थी सहभाग घेत आहेत .या लवकर सुरु झालेल्या वर्गाचा त्यांना नक्कीच खुप फायदा होईल अशी प्रतिक्रिया सर्व पालक वर्गातून व्यक्त होत आहे.

गुढी पाडवा, पट नोंदणी वाढवा ,या शासनाच्या उपक्रम चांगल्या प्रकारे शाळेत राबवला जातो आहे ,१ एप्रिल रोजी वर्ग सुरु करताना पालक . शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुप्रिया सनये ,जेष्ठ शिक्षिका सौ प्रीती नारकर ,शिक्षक , तात्या लवटे , पदवीधर शिक्षिका सौ अमृता पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते .