
सावंतवाडी : मान्सून पूर्व काम झाली नाही वस्तूस्थिती आहे. मे महिन्यात काम पूर्ण न झाल्याने विजेची समस्या असल्याची प्रांजळ कबुली दोडामार्ग उप कार्यकारी अभियंता विशाल हंत्तरगी यांनी दिली. माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले, मे महिन्यात मान्सून पूर्व काम झाली नाहीत ही वस्तूस्थिती आहे. तुमच्याशी खोटं बोलणार नाही अशी प्रांजळ कबुली दिली. मात्र, ही काम आता अंतिम टप्प्यात आहेत. कंत्राट दारांच्या टीम कार्यरत आहेत. वाहन व कटर आदी गोष्टींची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आडाळीतील वीज वाहिनीचा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यावर तात्काळ उपाययोजना करा, लोक आता त्रासली आहेत. वाहन अन् साधनसामग्री आजच पुरवली जाईल. व्यवस्थापन टीमची स्थानिक ठिकाणी निवास व्यवस्था करा अशा सूचना आ. दीपक केसरकर यांनी दिल्या. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, माजी नगराध्यक्ष संजू परब आदी उपस्थित होते.