
दोडामार्ग : दोडामार्ग पोलीस ठाण्यात वाहन चालक म्हणून सेवा बजावणारे पोलीस कर्मचारी दीपक सुतार यांची हृदय विकारच्या तीव्र झटक्याने गुरुवारी सकाळी अनपेक्षित एक्झिट झाली. त्यांच्या या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.
दीपक गुंडू सुतार हे तिलारी धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या पाटये गावाचे रहिवासी असून सध्या ते झरेबांबर येथे वास्तव्य करत होते. काही वर्षापूर्वी सिंधुदुर्ग पोलीस दलात ते सेवेत रुजू झाले होते. जिल्हा ठिकाणी अनेक वर्षे सेवा बजावल्या नंतर आता ते दोडामार्ग पोलीस ठाण्यात वाहन चालक म्हणून कार्यरत होते. गुरूवारी सकाळी आठ वाजता ते दोडामार्ग पोलीस ठाण्यात ड्युटीवर हजर झाले. यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखणे सुरू झाले. त्यामुळे तातडीने पुढील उपचारासाठी गोवा येथे नेत असताना वाटेतच त्यांचं निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनामुळे दोडामार्ग तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, इतर परिवार आहे. ते मनमिळावू आणि आपल्या सेवेत कर्तव्यदक्ष असल्याने त्यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या अकाली एक्झिटने साऱ्यांनाच धक्का दिला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.