MIT राष्ट्रीय सरपंच संसदेच्या जिल्हा समन्वयकपदी प्रेमानंद देसाई यांची नियुक्ती

सरपंच, शेतकरी बांधवांच्या सहकार्याने लक्षवेधी कामगिरी करणार : देसाई
Edited by: संदीप देसाई
Published on: November 21, 2022 19:29 PM
views 269  views

पुणे : एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक पदी  प्रेमानंद देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथे एम.आय. टी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या दोन दिवसीय अधिवेशनात शनिवारी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती उबर व विश्वशांती विद्यापिठाचे कार्यकारी अध्यक्ष  राहुल कराड, प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील, राज्य समन्वयक प्रकाश महाले, कार्यवाह व्यंकटेश जोशी, ज्ञानेश्वर बोडके, महाराष्ट्र संघटक नामदेवराव गुंजाळ, ग्रामविकास समितीचे प्रमुख बाजीराव सैरनार यांच्यासह महाराष्ट्रातील ३४ जिल्हाध्यक्ष व जिल्हा समन्वयक व महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकान्याची उपस्थिती होती.


या दरम्यान आपल्या सामाजी कार्याची दखल घेऊन एम. आय.टी. चे प्रमुख विश्वनाथ कराड, राहुल कराड, योगेश पाटील संतोष राणे, कोकण प्रांत अध्यक्ष यांनी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रीय सरपंच संसदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सरपंच यांना एकत्रीत करून त्यांच्या अडचणी सोडवणे. ग्रामिण भागातील प्रत्येक तालुक्यातील एक गाव CSR फंडातून आदर्श करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आवश्यक योजनांची अमंलबजावणी करण्याची कामगीरी करणार असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल सर्व स्तरातून प्रेमानंद देसाई यांच अभिनंदन होत आहे.