'प्रयाण'च्यावतीने रणरागिणींचा सन्मान

महिलांना आर्थिकदृष्ट्या उन्नत करण्याचा प्रयत्न : अपर्णा कोठावळे
Edited by: विनायक गावस
Published on: October 19, 2023 17:53 PM
views 51  views

सावंतवाडी : 'प्रयाण' महिला पर्यटन संस्था महिलांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी  सातत्याने प्रयत्न करीत असून आगामी काळात महिलांना आर्थिक बाबतीत उन्नत करण्यासाठी संस्था प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा कोठावळे यांनी केले. येथील नगरपरिषद सभागृहात प्रयाण महिला पर्यटन संस्थेमार्फत सावंतवाडी तालुक्यातील विशेष कार्य करणाऱ्या रणरागिणीचा सन्मान नवरात्र उत्सवानिमित्त करण्यात आला. यावेळी अध्यक्ष अपर्णा कोठावळे, उपाध्यक्ष अनारोजिन लोबो, सचिव मर्सेलिना डिसोझा, सदस्य भारती मोरे, छाया देशपांडे, प्रा. प्रतिभा चव्हाण आदि पदाधिकारी उपस्थित होत्या.

दरम्यान, प्रास्ताविक सादर करताना संस्थेच्या उपाध्यक्ष अनारोजिन लोबो म्हणाल्या की, मंत्री दीपक केसरकर यांच्या दूरदृष्टीतून प्रयाण संस्था सातत्याने महिलांच्या न्याय, हक्क आणि त्यांच्या सन्मानासाठी प्रयत्न करीत आहे. समाजात चांगलं काम करणाऱ्या महिलांना गौरविणे हे देखील आमचे कर्तव्य आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, महाराष्ट्र माझाच्या ज्येष्ठ पत्रकार मंगल कामत, शुभांगी सुकी, ममता पाटणकर, अनंमारी डिसोझा, ग्रेसी डिसिल्वा, वैभवी शेवडे, साधना रेगे, सौ. सोनटक्के,  सुनिता पार्लर, समीरा खलील, गायत्री कांडारकर, कीर्ती बोंद्रे, शितल शिरसाट, दर्शना सावंत, सरोज पाटणकर, अनुष्का गोवेकर, हेलन निब्रे, भारती परब, अफरोज राजगुरू, परवीन बेग,आसावरी शिरसाट, पूजा नाईक, रेखा कुमठेकर, शैलेजा पारकर, वर्षा मोंडकर, सावंत आदि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.

दरम्यान यावेळी उपस्थित महिलांना प्रसाद नाडकर्णी यांनी 'पर्यटनातून महिलांची आर्थिक उन्नती' या विषयावर मार्गदर्शन केले. सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी 'आजच्या काळातील महिलांची जबाबदारी व कर्तव्ये' या विषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास उपस्थित अनेकांनी प्रयाण संस्थेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यात 'सामाजिक बांधिलकी'चे  रवी जाधव, ज्येष्ठ पत्रकार मंगल कामत, माजी उपनराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर यांनी ' प्रयाण' संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोदगार काढले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अपर्णा कोठावळे यांनी केले. तर आभार अनारोजिन लोबो यांनी मानले.