
मंडणगड : भारतीय जनता पार्टीचे मंडणगड तालुका अध्यक्षपदी लाटवण येथील युवाकार्यकर्ते प्रविण कदम यांची निवड झाली आहे. 20 एप्रिल 2025 रोजी पार्टीचे तालुका कार्यालयात निवडी प्रक्रीयेचा कार्यक्रम संपन्न झाला. भाजपच्या संघटन पर्वा मध्ये पूर्ण महाराष्ट्रात संघटनात्मक निवडणुकी पार पडत आहेत. मंडल अध्यक्षांच्या निवडी झाल्या आहेत याचाच एक भाग मंडणगड (मंडल) तालुक्यात मंडल अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली यावेळी तालुकाध्यक्ष श्री लक्ष्मण मोरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिगवण, निवडणुक अधिकारी श्रीराम इदाते यांच्यासह भाजपचे तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मंडल अध्यक्षासाठी अनेक नावे पक्षाकडे कार्यकर्त्यांनी सुचवलेली होती असे भाजपा जिल्हा महामंत्री व निवडणूक अधिकारी श्रीराम इदाते यांनी निवड प्रक्रीया पुर्ण झाल्यावर सांगितले.
पक्षाने दिलेली विचारसरणी व नियमांच्या आधारावर मंडल अध्यक्ष निवड करण्यात आली. यात प्रथम क्रमांकावर प्रवीण कदम यांचे नाव मंडलातील सर्वात जास्त कार्यकर्त्यांनी सुचवले व उपस्थितांनी सर्वानुमते सहमती दिली तसेच प्रदेशकडून होकार आल्याने प्रविण कदम यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी श्रीराम ईदाते यांनी घोषित केले आहे.
पार्टीचे मावळते मंडणगड मंडल अध्यक्ष श्री लक्ष्मण मोरे यांनी श्री प्रविण कदम यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अप्पा मोरे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने भाजपचे संघटन तालुक्यात वाढवण्यासाठी पक्षाचे विचार घरोघरी प्रयत्नपूर्वक अनेक कार्यक्रम राबवून पोहचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता पक्ष देईल ती जवाबदारी त्यांनी मोठ्या प्रयत्नाने पार पाडली आहे. भाजपा साठी या पुढेही लागेल ते सहकार्य करण्याचे त्यांनी सांगितले. नवंनिर्वाचित मंडणगड मंडल अध्यक्ष प्रविण कदम यांनी पक्षाने दिलेली जवाबदारी वरिष्ठ भाजपा कार्यकर्त्यांच्या सहकार्याने नक्कीच पक्षवाढीसाठी व मंडणगडच्या विकासासाठी काम करणार असल्याचे निवडीनंतर सांगितले