सिंधुदुर्गनगरी : प्रवीण मांजरेकर हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. पत्रकारीते मध्ये तर ते पारंगत होतेच मात्र त्याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये ते पारंगत होते. जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणी मध्ये त्यांचा सहभागा फार महत्त्वाचा होता. मात्र आपण आपला महत्त्वाचा असा पदाधिकारी गमावला याचे मोठे दुःख आहे असे मनोगत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि सिंधुदुर्ग नगरी मुख्यालय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक पत्रकार भावनांमध्ये दिवंगत प्रवीण मांजरेकर यांच्यासाठी शोक सभा ठेवण्यात आली होती. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर बोलत होते. यावेळी सचिव बाळकडकर, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, चंद्रकांत सामंत, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे,जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आनंद लोके,बंटी उर्फ विद्याधर केनवडेकर,संतोष राऊळ ,किशोर जैतापकर, संतोष सावंत,सदस्य राजन नाईक,लवू म्हाडेश्वर,लक्ष्मीकांत भावे,अमित खोत,प्रशांत वाडेकर,महेंद्र मातोंडकर,सुहास देसाई,देवयानी वरस्कर ,संजय वालावलकर, दत्तप्रसाद वालावलकर, प्रमोद महाडगूत, विनोद दळवी, तेजस्वी काळसेकर, विनोद परब, गिरीश परब, मनोज वारंग, नंदकुमार आयरे, यांसह जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य तसेच मुख्यालय पत्रकार संघाचे पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी बाळ खडपकर, गजानन नाईक, तेजस्वी काळसेकर, संदीप गावडे, अमित खोत, गणेश जेठे, आनंद लोके,दत्तप्रसाद वालावलकर आदींनी या अशोक सभेत आपली मनोगते व्यक्त केली. पत्रकार आणि नाट्यकरमी त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे आणि क्रिकेटच्या मैदानातच ज्यांनी आपला देह ठेवला ते दिवंगत पत्रकार प्रवीण मांजरेकर यांच्या बद्दलच्या अनुभवाने पूर्ण सभागृह अक्षाच्या दुःखाच्या खाईत कोसळले होते. केवळ पत्रकारच नव्हे तर नाट्य, क्रीडा, समाजकारण अशा सगळ्यांमध्येच अष्टपैलू कामगिरी करणारे आणि सर्वांना हवे हवे असे वाटणारे कैलासवासी मांजरेकर यांच्या जाण्याने या सर्व क्षेत्रांचे फार मोठे नुकसान झाले आहे. याच बरोबर जिल्हा पत्रकार संघाचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना या सर्वांनी व्यक्त केल्या. दिलदारपणा आणि कोणत्याही कामा मधील त्यांचा घुसून काम करण्याचा स्वभाव यामुळे ते सर्वांना हवे होते मात्र देवाने त्यांना लवकर बोलावले खरे म्हणजे देवालाही त्यांची आवश्यकता असेल अशा शब्दात उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.सुरुवातीला प्रवीण मांजरेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून फुले वाहण्यात झाली. तसेच स्तब्ध राहून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी सर्वांकडून प्रार्थना करण्यात आली.