मिठबाव व्यापारी मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी प्रवीण लोके

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 04, 2024 15:25 PM
views 91  views

देवगड : देवगड मिठबाव येथील व्यापारी  मित्रमंडळ या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रवीण दिगंबर लोके यांची निवड करण्यात आली आहे. व्यापारी मित्र मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष प्रकाश कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर ही निवड करण्यात आली.

मिठबाव व्यापारी मित्रमंडळाची सभा शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता जेठे गार्डन येथे संपन्न झाली. या सभेत मिठबाव बाजारपेठ व्यापारी मित्र मित्रमंडळाचे तात्कालीन अध्यक्ष प्रकाश कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या रिक्त पदावर नुपूर चिकन सेंटरचे मालक प्रवीण दिगंबर लोके यांची निवड सर्वानुमते आज करण्यात आली. 

मित्र मंडळाचे उपाध्यक्ष प्रसाद गावकर ,सचिव विनोद लोके, सहसचिव दिनेश फाटक, खजिनदार बाळू जेठे सह सर्व व्यापारी बंधू उपस्थित होते. मित्र मंडळाचे अध्यक्षपदी प्रवीण लोके यांची निवड जाहीर होताच. मिठबाव सरपंच महादेव उर्फ भाई नरें , तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पंडित पारकर, शैलेश लोके, पंडित लोके, व्यापारी मित्रमंडळ सल्लागार समितीचे सर्व सदस्य,  तसेच सर्व व्यापारी वर्ग,आदी उपस्थित होते.