
कणकवली : वात्सल्य सामाजिक संस्था व निर्धार न्यूज लोकसेवा फाऊंडेशन, महाराष्ट्र आयोजित मराठी राजभाषा दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून 'छत्रपती शिवराय संमेलन, कुडाळ २०२३' या कार्यक्रमात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माईण नंबर - १ च्या उपक्रमशील पदवीधर शिक्षिका प्रतिक्षा प्रसाद तावडे यांना 'राष्ट्रीय लोकसेवा शैक्षणिक सेवारत्न सन्मान २०२३' हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका कमलताई परुळेकर यांच्याहस्ते तसेच पद्मश्री पुरस्कारप्राप्त परशुराम गंगावणे, आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा समीक्षक व मार्गदर्शक अशोक दाभोलकर, कोकणसादचे उपसंपादक प्रा. रुपेश पाटील, वात्सल्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा नेहा परब यांच्या उपस्थितीत शाल, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह अशा स्वरूपात मराठा समाज सभागृह, कुडाळ येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
प्रतिक्षा तावडे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत. यापूर्वी त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.