तुळस येथील नुकसानग्रस्तांना प्रथमेश तेलींची तात्काळ मदत

Edited by: दिपेश परब
Published on: December 29, 2023 14:54 PM
views 562  views

वेंगुर्ला : तालुक्यातील तुळस जैतिर मंदिर नजीक असलेल्या रमाकांत विष्णू पेडणेकर यांच्या घराला काल २८ डिसेंबर सायंकाळी भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले. यावेळी भाजप युवा मोर्चा पदाधिकारी प्रथमेश तेली यांच्यासाहित भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच यावेळी पेडणेकर कुटुंबीय यांना भेट देत घरगुती व जीवनावश्यक  साहित्यासहित घर व व्यवसाय उभा करण्यासाठी शासनाच्या माध्यमातूनजेवढी जास्त मदत उभी करता येईल तेवढी करण्याचे आश्वासन दिले. यावेकी सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, परबवाडा उपसरपंच पप्पू परब, सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ, सोसायटी चेअरमन संतोष शेटकर, सामाजिक कार्यकर्ते रामू परब, युवा मोर्चाचे नारायण कुंभार, प्रणव वायंगणकर, हितेश धुरी, हेमंत गावडे, मारुती दौडशानट्टी, भूषण आंगचेकर, वैभव होडावडेकर, हेमंत तुळसकर, ऋत्विक आंगचेकर आदी उपस्थित होते.