वृत्तपत्रविद्या पदविका परीक्षेत प्रसन्न सोनुर्लेकर प्रथम

प्रल्हाद मांजरेकर द्वितीय, दिपक पटेकर तृतीय
Edited by: विनायक गावस
Published on: July 06, 2023 14:46 PM
views 208  views

सावंतवाडी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका परीक्षेत कु. प्रसन्न सोनुर्लेकर याने विशेष प्रविण्यासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. प्रल्हाद मांजरेकर यांनी द्वितीय तर दिपक पटेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर या अभ्यासकेंद्रामार्फत सदर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जातो. यावर्षी  सदर पदविकेसाठी प्रविष्ट  समीर वंजारी, संदिप राठोड,  वैष्णवी सावंत, सिद्धेश‌ सावंत हे सर्व परीक्षार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्व परीक्षार्थींना श्री. राजेश मोंडकर व प्रा. रूपेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.