
सावंतवाडी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या गांधी विचार दर्शन पदविका परीक्षेत सावंतवाडी येथील आरपीडी कॉलेज कॅम्पस मधील डॉ. जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज अभ्यास केंद्राचा विद्यार्थी प्रसन्न प्रदीप सोनुर्लेकर याने उल्लेखनीय यश संपादन केले. विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण होत प्रसन्नने पदविका प्राप्त केली.
जगभरातील समकालीन सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व" या विषयावर संशोधन प्रकल्प त्याने सादर केला. प्रकल्पासाठी त्याला डॉ. बी. एन. हिरामणी यांचे मार्गदर्शन लाभले.
मागील वर्षी पदवी परीक्षेत देखील प्रसन्नने इतिहास विषयात सुवर्णपदक प्राप्त करून विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला होता. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक तसेच अभ्यास केंद्राचे समन्वयक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.










