
वेंगुर्ले : वेंगुर्ले येथील भाजप चे सक्रिय पदाधिकारी आणि विद्यमान जिल्हा सरचिटणीस श्री प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांची सिंधुदुर्ग जिल्हा भाजप उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
वेंगुर्ले तालुक्यासह जिल्ह्यात भाजप च्या अनेक उपक्रमांमध्ये देसाई यांचा सक्रिय सहभाग असतो. राजकारणा बरोबर समाजकारणात ही ते सक्रिय असतात. कार्यक्रमाचे योग्य नियोजन करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यामुळेच आज भाजप जिल्हाद्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारणीमध्ये त्यांची जिल्हा उपाद्यक्ष पदी निवड झाली आहे.