वरळीतील सहकारी शिक्षण विकास संस्थेच्या संचालकपदी प्रसाद नारकर बिनविरोध

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 06, 2024 14:15 PM
views 78  views

मुंबई : वरळी(मुंबई) येथील सहकारी शिक्षण  विकास समुह मर्यादित संस्थेच्या संचालकपदी वैभववाडी नाधवडे येथील प्रसाद नारकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

   स्वर्गिय राजाराम शास्री भागवत यांनी सन १८८६ साली वरळीच्या सहकारी शिक्षण विकास समुह मर्यादित संस्थेमार्फत मराठा हायस्कुलची स्थापन केली. गेल्या १३८वर्षात या संस्थेच्या माध्यमातून हे हायस्कूल कार्यरत आहे.सध्या या शाळेत सुमारे 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेने अनेक नामवंत विद्यार्थी घडवले.या शाळेच्या  गैरवशाली इतिहासात भारतीय घटनेचे शिल्पकार  स्वर्गीय  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुणे विद्यापिठाचे माजी उपकुलगुरु गणितज्ञ रॉगलर परांजपे हे या शाळेचे  विद्यार्थी होते. तसेच  क्रिकेट जगात नावाजलेले खेळाडू मध्ये कै. एकनाथ सोलकर , कै.रामनाथ पारकर,  उमेश कुलकर्णी, शरद हजारे, कै. सुभाष अंबीये, अनंत सोलकर,  दिलीप केल्याणकर, श्री बोटले आदी विद्यार्थी देखील याच शाळेत शिकले होते.या शिक्षणसंस्थेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये संचालकपदी वैभववाडीच्या प्रसाद नारकर यांची निवड झाली. वैभववाडीसाठी हा मोठा बहुमान ठरला आहे.

निवडीनंतर बोलताना श्री.नारकर म्हणाले, या निवडीमुळे शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे.या संधीचा नक्कीचा समाजातील सर्व घटकांना लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न करीन.तसेच या संस्थेत काम करणं ही मोठी जबाबदारी आहे.सर्वांच्या सहकार्यने ती प्रामाणिकपणे पार पडेन असं श्री नारकर यांनी सांगितले.