
वैभववाडी : ठाकरे शिवसेना वैभववाडी तालुका सहसंपर्कप्रमुख पदी प्रसाद नारकर यांची निवड करण्यात आली.माजी खासदार विनायक राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
ठाकरे शिवसेनेत संघटना बळकटीसाठी नव्याने पदाधिकारी निवडी करण्यात येत आहेत .यामध्ये तालुका सहसंपर्कप्रमुख पदी प्रसाद नारकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने झाली आहे. नारकर हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत. ते मुळ नाधवडे येथील रहिवासी आहेत.
सध्या मुंबईस्थित असले तरी तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.पक्षाने त्यांच्यावर वैभववाडी तालुक्याची जबाबदारी सोपवली आहे.या निवडीनंतर बोलताना श्री नारकर म्हणाले, तालुक्यात शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.सर्वांच्या साथीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.