LIVE UPDATES

प्रणाली माने यांच्यासह मुलाला अंतरिम अटकपूर्व जामीन

प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 08, 2025 16:59 PM
views 166  views

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी देवगड येथील प्रणाली माने आणि आर्य माने या दोघांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही एस देशमुख यांनी मंजूर केला आहे. 

सावंतवाडी माठेवाडा येथील प्रिया चव्हाण या विवाहित महिलेने आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्ये प्रकरणी प्रिया चव्हाण यांच्या आई - वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रिया चव्हाण हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगड येथील प्रणाली माने आणि आर्यमाने या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आपल्याला अटक होऊ नये यासाठी प्रणाली माने आणि आर्य माने यांनी येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता या अर्जावर 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत न्यायालयाने या दोघांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.