
सिंधुदुर्गनगरी : वरिष्ठ लिपिक अधिसंख्य पदाचा नियुक्ती आदेश देण्यात येऊन देवगड तालुक्यातील वाडा हायस्कुल मध्ये सेवेत रुजू करून घेण्यात यावे या मागणीसाठी जामसंडे येथील प्रमोद मनोहरराव सोनकुसरे यांनी जिल्हा परिषद भवना समोर आज सोमवार पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे व न्याय मिळे पर्यत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा दिला आहे
शरीरिक दृष्ट्या दिव्यांग असलेले प्रमोद सोनकुसरे हे वाडा हायस्कुल मध्ये लिपिक पदावर होते परंतु अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्याने सेवामुक्त करण्यात आले परंतु केवळ सोनकुरे यांचेच नव्हे तर राज्यातील शेकडो कर्मचाऱ्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले होते मात्र या सर्व कर्मचाऱ्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून व प्रशासनाची होणारी अडचण दूर करण्यासाठी सर्व सबंधिताना सेवेत ठेवण्यात आले असे असताना मात्र आपल्यालाच सेवेतून कमी करून अन्याय केल्याचे सोनकुरे यांनी सांगितले व न्याय मिळण्यासाठी आपण बेमुदत धरणे आंदोलनला बसल्याचे सांगितले
आपल्याला वाडा हायस्कूल मध्ये सेवेत घेण्याची प्रमुख मागणी असून त्याबरोबरच आपल्यावर अन्याय करणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, हेतू पुरस्कार डावलणाऱ्या सस्थेवर कारवाई करण्यात यावी आपल्याला न्याय मिळेपर्यत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रोखून धरावे अशा मागण्याचे निवेदन प्रमोद सोनुकसरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले आहे व न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असे म्हटले आहे.