तेंडोलीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रमोद राऊळ बिनविरोध

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 10, 2025 12:54 PM
views 115  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद रामचंद्र राऊळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तेंडोली ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ही निवड सर्वानुमते पार पडली.

यावेळी नवनिर्र्वाचित अध्यक्ष प्रमोद राऊळ यांचे सरपंच अनघा तेंडोलकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्रमोद राऊळ यांनी तेंडोली गावाच्या विकासासाठी आपण नेहमीच काम करत आलो असून यापुढेही सर्वांना सोबत घेऊन काम करत राहू, असे आश्वासन दिले.

या निवडीवेळी उपसरपंच आकाश मुनणकर, माजी सरपंच मंगेश प्रभू, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संदेश प्रभू, विष्णू तेंडोलकर, सत्यवान तेंडोलकर, रामचंद्र राऊळ, संदीप प्रभू, भगवान गावडे, शशिकांत आरोलकर, ग्रामविकास अधिकारी सौ. कदम आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.