
सावंतवाडी : दुधापासून पदार्थ बनविण्याचा प्रकल्पावरून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोरच माजी आमदार प्रमोद जठार यांनी परखड मत व्यक्त केलं. शासकीय योजनेतून होणारा हा प्रकल्प याआधी खासगी तत्त्वावर जिल्ह्यात राबवून दुधानं तोंड भाजून घेतल आहे. पुन्हा तसं होऊ नये, शेतकऱ्यांना याचा फायदा मिळावा म्हणून सुरुवातीपासून आपला आकांडतांडव सुरु आहे असं मत प्रमोद जठार यांनी व्यक्त केले. रत्नसिंधू योजनेची आढावा बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.
सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली रत्नसिंधू योजनेची आढावा बैठक पार पडली. यावेळी विविध योजनांचा आढावा घेतला गेला. यात दुधापासून पदार्थ बनविण्याचा प्रकल्पावरून माजी आमदार प्रमोद जठार यांनी परखड मत नोंदवल. या योजनेतून जिल्ह्यातील शंभर शेतकऱ्यांना देशी गाईच्या दुधा पासून तूप निर्मितीसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यासाठी त्यांना देशी गाईचा पुरवठा केला जाणार आहे. सुरुवातीला 200 गाई उपलब्ध करून त्यातून अधीक उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा मिळण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. या प्रकल्पाच्या टीएसवरून शिक्षणमंत्र्यांसमोर माजी आमदार जठार यांनी आपलं मत मांडल. दुधापासून बनविल्या जाणाऱ्या या प्रकल्पाला आपण मार्गदर्शन करायला तयार आहे. हा प्रकल्प मी खासगी तत्त्वावर जिल्ह्यात राबविला आहे. दुधापासून सर्व पदार्थ तयार केले आहेत. त्याच दुधानं तोंड ही भाजून घेतल आहे. त्यामुळे आता शासनाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने दुधापासून पदार्थ बनविण्याचा प्रकल्प जिल्ह्यातच राबवू, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल यासाठी प्रयत्न करू असं ते म्हणाले. यावर मंत्री केसरकर यांनी जठार यांची मदत घेण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना केल्या. तर कार्यालयात येऊन बसायची वेळ आणू नका असाही इशारा दिला.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे माजी आमदार प्रमोद जठार उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी आदी उपस्थित होते.
पैसा पाण्यात !
श्रीराम वाचन मंदिर समोरील 'आय लव सावंतवाडी' काढून त्या ठिकाणी खाऊगल्ली उभी करा, स्लॅब खालील बाजूस महिला बचतगटांच्या माध्यमातून ही खाऊ गल्ली उभी करण्याच्या सुचना केसरकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिली.
गेली दोन वर्षे 'आय लव्ह सावंतवाडी' हा सेल्फी पॉईंट अपुर्ण अवस्थेत आहे. संजू परब यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात ते उभारले गेले होते. प्रशासकीय राजवटीत ते काम अपूर्ण राहिलं. दरम्यान, हे सेल्फी पॉईंटच बांधकाम हटवून खाऊ गल्लीसाठी बैठक व्यवस्था करण्याचे आदेश दीपक केसरकर यांनी दिले आहेत. त्यामुळे सेल्फी पॉईंटसाठी खर्ची घातलेला पैसा पाण्यात गेला आहे.