प्रमोद जठारांनी घेतली सुरेश प्रभूंची भेट...!

Edited by:
Published on: March 08, 2024 09:36 AM
views 161  views

सिंधुदुर्ग : सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून भाजपकडून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार हे निश्चित केले नाही आहे. पण भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यानंतर माजी आमदार प्रमोद जठार हे देखील लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. 

आणि त्यांनी पक्षाकडे तसा प्रस्तावही दिला आहे पण भाजप हा मोठा पक्ष आहे. वरिष्ठांचे जे आदेश येतील ते आपल्याला मान्य असतील असे जठार यांनी सांगितले आहे. पण दुसरीकडे जठार हे भाजपच्या कार्यकर्त्यांची गाठीभेटी घेत आहेत तसेच शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची देखील त्यांनी भेटी घेतल्या आहेत. शुक्रवारी सकाळी जठरांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली यावेळी कोकण विकासच्या ब्लू प्रिंट संदर्भात चाय पे चर्चा झाली कोकणातील शेतकरी, युवक, महिला तसेच कोकण विकासच्या बाबतीत महत्वाचे असणारे रोजगानिर्मितीचे  पर्यावरण पूरक प्रकल्प आणण्याबाबत चर्चा केली. प्रभू यांनी या बाबत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन  दिले.