सर्वोदय पतसंस्थेचा कारभार पारदर्शक- प्रकाश मोर्ये

Edited by: भरत केसरकर
Published on: October 24, 2023 20:42 PM
views 172  views

कुडाळ:सर्वोदय सहकारी पतसंस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक असून सर्व कर्ज प्रकरणे ही अत्यंत पारदर्शकपणे व सहकाराच्या नियमात बसूनच केली आहेत. त्यामुळे पतसंस्थेसह आपली व संचालकांची बदनामी करणाऱ्या दिलीप माळकर यांना आपण कायदेशिर नोटीस पाठवली असून लवकरच त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला जाईल. त्यामुळे उगाचच दिलीप माळकऱ यांनी आपली बदनामी करू नये. ही बदनामी थांबली नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सर्वोदय पतसंस्थेचे चेअरमन तथा पॅनल प्रमुख प्रकाश मोर्ये यांनी दिला आहे.तर आपली नाहक बदनामी करणाऱ्या दिलीप माळकर यांच्याविषयी जर मी बोलायला गेलो आणी तोंड उघडल तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही.अशा इशारा पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन प्रकाश मोर्ये यांनी दिला आहे. कोणतेही कागदपत्र नसताना दहा लाखाचे कर्ज उचलल्याची जे माळकर बदनामी करत आहेत, त्यात कोणतेही तथ्य नसून सहकाराच्या नियमाप्रमाणे कर्ज उचल झाली असून त्याचे रितसर आपण हप्ते भरत आहे.तर यासाठी लागणारे सर्व तारण आपण दिले आहे.असा खुलासा प्रकाश मोर्ये यांनी कोकणसाद लाईव्हशी बोलताना केला आहे.

    यावेळी बोलताना प्रकाश मोर्ये म्हणाले जे माहितीच्या अधिकारात माहिती समोर आली आहे अस म्हणारे दिलीप माळकर हे किती अज्ञानी आहेत ते लक्षात येते.कारण पतसंस्थेला माहितीचा अधिकार लागू होत नाही. तब्बल 38 वर्षानंतर या पतसंस्थेची निवडणूक ही विरोधी पॅनलने लादली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही आपली मागणी होती. या आपल्या मागणीला आमच्या पॅनलचाही पाठिंबा होता.जे विरोधी पॅनल आहे त्यांच्यासमोर आम्ही हा प्रस्ताव ठेवला होता. परंतु काही लोकांच्या हेकेखोर वृत्तीमुळे ही निवडणूक होत आहे.कै.शिवरामभाऊ जाधव यांनी माणगाव खोऱ्यातून सर्वोदय पतसंस्थेच्या माध्यमातून उभे केलेले सहकाराचे रोपटे टिकले पाहिजे.हा आमचा मुळ हेतू होता. पण काही लोकांनी ही निवडणूक लादली आहे.अन्यथा ही निवडणूक बिनविरोध झाली असती.

    मी कर्ज घेतले त्याला रितसर कागदपत्रे दिली आहेत. यासाठी आवश्यक लागणारे तारण दिले आहे.आमचे संचालक उत्तम सराफदार यांच्याकडे यांचे कर्ज असल्याचा आरोप केला आहे. ते सगळे कर्ज त्यानी भरले असून दीड दोन महिन्यापूर्वी नाममात्र कर्ज घेतले आहे.आणि त्या कर्जाचे तारण देऊन त्याचे हप्ते पण रितसर सुरू आहेत.दुसरे संचालक जोसेफ डाॅन्टस यांचे कर्ज असून त्यानी रितसर तारण जमिन ठेवून हे कर्ज घेतले आहे.आणि यासाठी माणगाव येथील जमीनही त्यांनी तारण म्हणून ठेवली आहे.त्याचे हप्ते रितसर सुरू आहेत.त्यामुळे उगाचच बिनगुडाचे आरोप करणाऱ्या दिलीप माळकर यांनी आधी सगळी माहिती समजून घ्यावी. 

     मी व माझे संचालक यांचे कर्ज प्रकरण थकीत असले असते तर या निवडणुकीत उभे राहताना अर्ज छाननी मध्ये आमचा अर्ज निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यानी बाद केला असता. परंतु आमची कोणत्याही प्रकारची थकबाकी नसल्याने हे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे उगाचच दिलीप माळकर यांनी ज्ञान पाजळू नये.असाही टोला मोर्ये यांनी लगावला आहे.

    सर्वोदय पतसंस्थेकडून विद्यमान अध्यक्ष प्रकाश मोर्ये यांनी स्वताच्या नावावर दहा लाख कर्ज घेतले.मात्र या कर्ज प्रकरणाला "जामिन" नसून कर्जदाराची पण "सही" त्या कर्ज फार्मवर नसल्याचा आरोप दिलीप माळकर यांनी करण्यापुर्वी पतसंस्थेच्या कार्यालयात जावून अधिकाराकडून कागदपत्रे तपासून घ्यावीत आणी मगच असे बिनबुडाचे आरोप करावेत.ही प्रशासकीय बाब असून सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत. त्यामुळे उगाचच खोटे आणी बिनबुडाचे आरोप करून पतसंस्थेला आणी मला बदनाम करू नये. आधी माहिती समजून घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाईस तयार रहावे असा इशाराही माळकर यांना प्रकाश मोर्ये यांनी दिला आहे.

     संस्थेचा उद्देश ठेवी स्विकारणे व कर्ज वितरीत करणे हा आहे. आम्ही सर्व उमेदवार प्रथमतः सभासद असुन आमच्या पॅनलमधील काही उमेदवार हे ठेवीदार असुन फक्त तीन उमेदवार हे कर्जदार आहेत. त्यामुळे आमच्या उमेदवारांनी संस्थेच्या उद्दीष्टा प्रमाणे संस्थेस हातभार लावलेला आहे. आम्ही संचालकांनी कधीही सभासदाच्या कर्ज प्रकरणाला विरोध केलेला नाही अथवा कर्जवसुलीकडे ही दुर्लक्ष केलेला नाही. त्यामुळेच आमच्या संस्थेला सतत तीन वर्षे ऑडीट वर्ग अ प्राप्त झाला आहे. विरोधी उमेदवार माळकर हे संस्थेत कर्मचारी होते व त्यांना कर्ज वसूलीचे काम दिलेले होते ते गेल्या १ वर्षांपुर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत.ते सेवेत असताना कर्ज वसूली विषयी व अन्य कारणास्तव संस्थेकडे कधीही तक्रार केलेली नाही.त्यामुळे आता केवळ निवडणुकीसाठी खोटा प्रचार करुन सभासदांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न चालवीला आहे. त्यामुळे सुज्ञ सभासद सदर प्रयत्न हाणुन पाडतील याची आम्हाला खात्री आहे.असेही मोर्ये यांनी म्हटले आहे.

    आम्ही कोणताही चुकीचा कारभार केला नाही. आम्ही स्वच्छ पारदर्शक कारभार केला असून पतसंस्थेच्या कोट्यावधीच्या ठेवी आजही पतसंस्थेत आहेत. सोनेतारण आणी अन्य कर्ज वाटप रितसर पद्धतीने केले आहे. जनतेच्या दरबारात आम्ही या निवडणुकीला सामोरे जात मतदान मागत आहोत. त्यामुळे केलेल्या कामाची पोच पावती म्हणून सर्व च्या सर्व जागावर आमचे उमेदवार विजयी होतील. मला कुठच्याही पदाची इच्छा नाही.आपण अनेक पदे आपल्या जीवनात उपभोगली. मी दिलदार आहे.पण उगाचच मला कोणीही बदनाम करू नये. जनतेच्या दरबारात मी न्याय मागण्यासाठी गेलो आहे त्यामुळे जनता मोठ्या मताधिक्याने माझ्यासह माझ्या सर्व उमेदवारांना या निवडणुकीत विजयी करेल. असा दावा प्रकाश मोर्ये यांनी यावेळी करत,आपल्याच पॅनलचा विजय निश्चित असल्याचे प्रकाश मोर्ये यांनी म्हटले आहे.