शिरंगे बोडण ग्रामपंचायतमध्ये गाव विकास पॅनलचे प्रकाश कदम विजयी

Edited by: संदीप देसाई
Published on: November 06, 2023 12:18 PM
views 336  views

दोडामार्ग : शिरंगे बोडण ग्रामपंचायत निवडणुकीत गाव विकास पॅनलचे प्रकाश जयराम कदम हे सर्वाधिक मतं मिळवून विजयी झाले आहे. विजयानंतर त्यांनी हा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करून गावच्या सरपंच पदी विराजमान केल्याबद्दल ग्रामवस यांचे आभार मानले आहे. विजयानंतर सरपंच यांचे सहकारी सदस्य गावकरी आणि सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

बोडण (शिरंगे पुनर्वसन), एकूण सदस्य संख्या 7

सरपंच - प्रकाश जयराम कदम विजयी (२७५ मते) ग्रामविकास पॅनल. प्रतिस्पर्धी उमेदवार भिकाजी गणपत कदम 79 मते मिळाली आहेत.

प्रभाग एक- १) रीया राजेश कदम बिनविरोध, *२) प्रशांत विलास गवस विजयी (८३ मते)*

प्रभाग दोन- १) महिमा महादेव घाडी बिनविरोध, २)संजय शंकर गवस बिनविरोध

प्रभाग तीन- १) प्रदीप केशव नाईक बिनविरोध, २) मानसी महादेव घाडी बिनविरोध, ३) वैशाली विश्वनाथ घाडी बिनविरोध