सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकपदाचा प्रज्ञेश बोरसे यांच्याकडे अतिरिक्त पदभार

Edited by:
Published on: April 12, 2025 19:31 PM
views 137  views

कणकवली : एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक पदी प्रज्ञेश बोरसे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातून एमडी कुसेकर यांनी तसे आदेश जारी केले आहेत. प्रज्ञेश बोरसे हे रत्नागिरी येथे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक म्हणून यशस्वीपणे काम करत आहेत. त्यांच्या एकूणच कामाची दखल घेऊन सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक पदाचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.