
सिंधुदुर्ग : वीज बिलाची रक्कम वेळेवर भरून सुद्धा गेले अनेक दिवस कोलझर पंचक्रोशीत दिवसा ही विज प्रवाह धड नसतो व रात्रीही, त्यामुळे या भागातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. रात्री च्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यावर जेवताना "निरांजनात तिळेल तेलाची वात आणि तोंडात हात" अशी परिस्थिती आलेली आहे.
शाळेत जाणारी मुले अभ्यास न करता वीज गायब असल्यामुळे अभ्यास न करताच झोपतात. वारंवार या विषयी महावितरण अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा यात काही फरक नाही. दररोज "येरे माझ्या मागल्या" असंच चाललं आहे. यात जर काही सुधारणा होत नसेल तर शासनाने आम्हाला रॉकेल चे दिवे व रॉकेल दयावे. नपेक्षा हा चाललेला विजेचा खेळ थांबवा व वीज पुरवठा सुरळीत करा असं न झाल्यास कोलझर पंचक्रोशीच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिव्यांग संघटना अध्यक्ष साबाजी सावंत यांनी दिला आहे.