
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने मणेरी, आंबेली गावातील व इतर भागात लाईनवर मोठ्या प्रमाणात पडझड झाली. दोडामार्ग शहर सह तालुक्यात अनेक गावांची बत्ती गुल झाली आहे. त्यामुळे खंडित झालेला वीज पूरवठा पूर्ववत होण्यास बराच वेळ लागणार आहे. अशी माहिती वीज वितरण कडून देण्यात आली आहे.
अनेक गावात वीज वाहिन्या तुटल्याने त्या पूर्वरत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असले तरी वीज पुरवठा पूर्वव्रत होण्यास वेळ लागणार असल्याने सर्व वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.