
देवगड : देवगड - निपाणी महामार्ग रस्त्यावर आधीच अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना तळेबाजार येथील खाडये मेडिकल समोर पडलेले रस्त्यावरील भले मोठे भगदाड तसेच तोरसोळे फाटा येथे रस्त्यावर पडलेला भला मोठा चर ठरत आहे. अपघातास कारणीभूत एखादा मोठा अपघात झाल्यावरती प्रशासनाला जाग येणार आहे का?अश्या प्रकारच्या वाहनचालक व ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
आधीच देवगड नांदगाव महामार्गावरती अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलेले असताना ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची त्यात भर पडतआहे. विविध केबल लाइन टाकण्यासाठी रस्त्यांवर चर मारले जातात परंतु ते चर चांगल्या प्रकारे भरले न गेल्यामुळे तसेच निकृष्ट प्रकारचे मटेरियल वापरून भरल्यामुळे ते चर पुन्हा निर्माण होतात. त्याची दखल परत घेतली जात नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे या रस्त्याला केबल लाइन टाकल्यानंतर चर तसेच राहिल्यामुळे त्या ठिकाणी मोठे खड्डे निर्माण होत आहेत. यामुळे नागरिकांमधून देखील तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.










