पोस्टर बॉय संदेश पारकरांनी आत्मपरीक्षण करावं

अंकुश जाधव यांचा टोला
Edited by: संदीप देसाई
Published on: October 27, 2023 14:45 PM
views 214  views

कणकवली :  कणकवली देवगड वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांच्या वर शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी वैभववाडीत टीका केली त्याला माजी सभापती अंकुश जाधव यांनी प्रत्युत्तर दिलय. पोस्टर बॉय संदेश पारकर यांनी नितेश राणेंवर टीका करण्यापूर्वी आपण काय केलं याच आत्मपरीक्षण करावं असाही टोला लगावला आहे.

      याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात माजी सभापती जाधव म्हणाले कि, आमदार नितेश राणे यांनी आपल्या विधानसभा मतदार संघात सत्तेत नसताना ही आणि आता सत्तेत असताना मोठया प्रमाणात विकास कामे केली आहे. हे मतदार संघातील जनतेने अनुभवल आहे. आरोग्य विषयक प्रश्न तळमळीने राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवत आहेत. मतदार संघात सातत्यपूर्ण सतत जनतेत जाऊन प्रश्न समजावून घेत ते स्वतः सोडवत आहेत. त्यांचा जनतेशी असलेला थेट संपर्क आणि संवाद त्यामुळे ते लोकप्रिय लोकप्रतिनिधी म्हणून राज्यात त्यांची प्रतिमा आहे. हे स्वार्थी राजकारण करणाऱ्या व ज्यांची ओळख जिल्ह्यात पोस्टर बॉय अशी आहे त्या संदेश पारकरांना कळणार नाही किंवा दिसणार नाही. चांगल्याला चांगल बोलण्याची दानत असायला हवी ती पारकर यांच्यात नाही. कणकवली शहरात पारकर यांच्या बाबतीत काय चर्चा असते हे कधीतरी अभ्यासावे. आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करतात ती केवळ  सतीश सावंत आणि पारकर यांच्यात असलेली आमदारकीचा उमेदवार (शिवसेना उ बा ठा) कोण? यावरून छुपी स्पर्धा आणि शीत युद्ध सुरु आहे हे सर्वाना माहित आहे. त्यातूनच पारकर असो किंवा सावंत हे आमदार राणे यांच्यावर टीका करीत असतात. मुळात त्यांच्या टिकेला काहीच अर्थ नसतो. पारकर आणि मंडळी सतत तुम्ही सत्तेत होता किती लोक हिताचे प्रश्न सोडवलात. किती संसार उभे केलात हे जाहीर करा. उगाचच विरोधाला विरोध म्हणून जिल्ह्यात होत असलेल्या विकासाला अपशकून करू नका. तुमची किती आणि कसे कार्यक्षम आहात हे जिल्ह्यातील जनतेला माहित आहे.  याचे कधीतरी आत्मपरीक्षण करणार आहात कि नाहीत. कि सतत राणे परिवाराचा द्वेष करायचा, अपप्रचार करायचं आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची. हा तुमचा फंडा आता कालबाह्य झाला आहे.

जिल्ह्यातील जनतेला माहित आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास झाला आहे. त्यामुळे पारकर यांनी यातून योग्य संदेश घ्यावा आणि उगाचच आमदार नितेश राणे यांच्या वर टीका करू नये, स्वतःच्या पक्षासाठी वेळ देऊन काम करावे. नाहीतर सतीश सावंतच कधी जिल्ह्यप्रमुख पद काढून घेतील हे समजणार नाही. असा उपरोधिक टीका माजी सभापती जाधव यांनी करत पारकर यांना जोरदार उत्तर दिले आहे.