पद असो किंवा नसो..समीर नलावडेंचं कार्य कौतुकास्पद आ. नितेश राणे

Edited by:
Published on: December 03, 2023 11:58 AM
views 269  views

कणकवली : समीर नलावडे यांनी गेल्या ५ वर्षात आदर्शवत काम केलं आहे. कणकवली विकसित आणि अग्रेसर शहर म्हणून पाहिलं जात आहे. राजकारणात पद असेपर्यंतच लोकप्रतिनिधी लोकांची सेवा करतात. पण ते पद गेल्यानंतर मतदारांकडे दुर्लक्ष करतात. मात्र, कणकवलीचे नगराध्यक्ष नसतानाही कणकवलीकरांसाठी अशा प्रकारचे उपक्रम चालू ठेवणे हे फार मोठे नेतृत्वगुण समीर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहेत.

कणकवलीत सलग ४ वर्षे खाऊ गल्ली सारखे अनोखे उपक्रम मुंबईसारख्या ठिकाणी होत नाहीत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमच्यावर केलेल्या संस्कार आणि शिकवण डोळ्यासमोर ठेवून पद असो किंवा नसो.. सातत्याने लोकांची सेवा करीत राहायचे कार्य समीर नलावडे, बंडू हर्णे व त्यांच्या सहकारी  करीत असल्याचे प्रतिपादन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले.

कणकवली गणपती साना येथे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने एक दिवस छोट्यांसाठी हा गेली ४ वर्ष राबवत लहान मुलांसाठी आहेत. या कार्यक्रमाचे भाजपा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले.  खाऊ गल्लीचा चॉकलेट च्या "खजिना"  आमदार नितेश राणे यांनी चावी लावत उघडला आणि  शेकडो मुले अक्षरशः या खजिन्यावर तुटून पडत लूट केली.त्यानंतर या  खजिन्यातील लपवलेले चॉकलेट मध्ये असलेल्या चार चांदीच्या कॉईनच्या चिठ्ठ्यांसाठी सर्वांचीच उत्कंठा शिगेला ताणली. या चॉकलेट मध्ये चांदीच्या कॉइन साठी ज्या चिठ्ठ्या लपवण्यात आल्या होत्या. त्यानंतर यातून चार जण भाग्यवान विजेते निवडले गेले. या चारही भाग्यवान विजेत्यांना आमदार नितेश राणेंच्या हस्ते चांदीचे कॉइन देऊन गौरविण्यात आले.  एक दिवस छोट्यांसाठी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. टेंबवाडी रस्ता ते ते गणपती साण्यापर्यंत अवघा परिसर गर्दीने फुलून गेला होता. अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल, छोट्यांसाठी विविध प्रकारची खेळणी, मिकी माऊस, या सोबतच सेल्फी पॉइंट व गाण्यांचा नजराणा व अनेक विविध उपक्रमांनी  एक दिवस छोट्यांसाठीचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यादगार ठरला. 

या एक दिवस छोट्यांसाठी खाऊ गल्ली या कार्यक्रमात सिंधू संकल्प अकादमी प्रस्तुत रोलर्स म्युझिकचे गायक संज्योती जगदाळे, हर्षद मेस्त्री, साक्षी मांजरेकर, निवेदक संजय धुरी यांनी उत्कृष्ठ सादरीकरण केले. जादूगार प्रसाद यांचे मनोरंजनात्मक व चित्त थरारक जादूचे प्रयोग सादर करण्यात आले.  लकी ड्रॉ, मुलांना कुपन व अन्य धमाकेदार कार्यक्रमांमुळे लहान मुलांमध्ये कार्यक्रमाची उत्सुकता वाढली होती.

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून ठेवलेल्या छोट्यांना पन्नास रुपयांचे कुपन घेण्याकरिता रांगा लागल्या होत्या. तर नदीपात्रात करण्यात आलेल्या कारंज्याने उपस्थित त्यांचे लक्ष वेधून घेतले. सेल्फी पॉईंट मध्ये फोटो काढण्यासाठी अनेकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. 

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष गोटया सावंत,माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक संजय कामतेकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप मेस्त्री, मेघा गांगण, अभिजीत मुसळे, किशोर राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, बंडू गांगण, चारुदत्त साटम, मेघा सावंत, कविता राणे, रवींद्र गायकवाड, राज नलावडे, शिशिर परुळेकर, प्रतीक्षा सावंत, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत महेश सावंत, प्राची कर्पे, संजना सदडेकर, राजू गवाणकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लागलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल व खेळांच्या ठिकाणी मुलांनी तुडुंब गर्दी केली होती.