
देवगड : पोंभूर्ले जिल्हा परिषद मतदार संघात जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत तब्बल 87 लाख इतक्या भरघोस निधीची विविध विकासकामे मंजूर झाल्याबद्दल खासदार विनायक राऊत यांचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी आभार मानले आहेत.
पोंभूर्ले जिल्हा परिषद मतदार संघातील ग्रामस्थांनी मागणी केलेल्या विविध विकास कामांना प्राधान्याने विकास निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी व पाठपुरावा माजी जिल्हा परिषद प्रदीप नारकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केलेली होती. त्याबाबत जिल्हा वार्षिक योजना सन 2022-2023 अंतर्गत विकास कामांकरिता भरघोस निधी उपलब्ध झालेला आहे. यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवीन इमारत बांधकाम फणसगांव गुरवभाटले, 2 वर्गखोल्या, रू. 24 लक्ष निधी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवीन इमारत बांधकाम नाद भोळेवाडी, 2 वर्गखोल्या, रू. 24 लक्ष निधी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दुरुस्ती, धालवली उर्दू शाळा, रू. 6 लक्ष निधी तर इतर जिल्हा मार्ग विकास कार्यक्रम अंतर्गत" देवगड, धालवली - कोर्ले तळीवाडी नरसाळे फणसगांव चव्हाटा मार्ग रस्ता इजिमा क्र. 1 करिता रू. 15 लक्ष निधी, देवगड, फणसगांव पेंडुरकरवाडी ग्रा. मा. क्र. 123 इजिमा रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे रू. 10 लक्ष निधी आणि "जनसुविधे अंतर्गत" देवगड, धालवली - कोर्ले तळीवाडी ते जुगाई मंदिरापर्यंत उर्वरित रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे रू. 8 लक्ष निधी याचा समावेश आहे. पोंभूर्ले जिल्हा परिषद मतदार संघातील कामांना प्राधान्याने विकास निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी ग्रांमस्थांच्या वतीने पोंभूर्ले जिल्हा परिषद मतदार संघाचे प्रतिनिधी तथा माजी जि.प. सदस्य प्रदीप नारकर यांनी केली होती. त्यानुसार खासदार विनायक राऊत यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामस्थांची विकास निधीची मागणी मान्य करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार राऊत यांचे श्री. नारकर यांनी आभार मानले आहेत.