
सावंतवाडी : पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उप निरीक्षक सतिश कविटकर नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. ३० जून रोजी काझी शहाबुद्दीन हॉल येथे त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब आदींनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी सावंतवाडी, युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी, पोलिस पाटील संघटना, माजी विद्यार्थी हळदीचे नेरूर, टाळंबा अस्मिता व्यासपीठ फाऊंडेशन आदी संघटना देखील यात सहभागी होत कविटकर यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी निवृत्त पोलिस अधिकारी दयानंद गवस, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, प्रमोद गावडे, रवी जाधव, देव्या सुर्याजी, संतोष गांवस, अनिकेत पाटणकर, अर्चित पोकळे, वैभव दळवी, सुरज मठकर आदी उपस्थित होते.