
सावंतवाडी : नगरपालिका निवडणुकीचे अनुषंगाने काल सायंकाळी जगन्नाथराव भोसले उद्यान ते आरपीडी स्कूल, मँगो हॉटेल जयप्रकाश चौक गांधी चौक राऊतपुरम नाका ते परत नगरपालिका रोड मार्गे जगन्नाथराव भोसले उद्यान असा रूट मार्च करण्यात आला.
यामध्ये सावंतवाडी पोलीस ठाण्याचे 4अधिकारी, 15 अंमलदार, दंगल नियंत्रण पथकाचे 42 अंमलदार, 5 होमगार्ड असे चार अधिकारी व 62 जवानांनी सहभाग घेतला. निवडणूक अनुषंगाने कायदा सुव्यवस्था राखण्याकरता व निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्याकरता जनतेला आश्वस्त करण्यासाठी या रूटमार्चचे आयोजन महा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शन खाली करण्यात आले होते.










