
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा पोलीस दलाच्यावतीने 2 ते 11 जानेवारी या कालावधीत पोलीस भरतीचे आयोजन करण्यात आले होते. यात मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी लवकरच जिल्हा पोलीस दलाच्या www.sindhudurgpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली आहे.
पोलीस शिपाई या पदासाठी दिनांक ५ ते ११ जानेवारी २०२३ या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आली होती. पोलीस शिपाई पदासाठी ४ हजार ८५५ पुरुष उमेदवार व १ हजार १०३ महिला उमेदवार असे एकुण ५ हजार ९५८ अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ४ हजार २९० उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर होते.
पोलीस चालक पदासाठी दिनांक २ ते ४ जानेवारी २०२३ या कालावधीत भरती आयोजित करण्यात आलेली होती. पोलीस चालक पदासाठी एकुण २ हजार १२६ अर्ज प्राप्त झालेले होते. त्यामध्ये पुरुष चालक पदासाठी २ हजार २७ उमेदवार व महिला चालक पदासाठी ९९ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी पुरुष चालक पदासाठी १ हजार २४८, महिला चालक पदासाठी ५६ महिला यांनी मैदानी चाचणीसाठी सहभाग नोंदविला असुन त्यांना मैदानी चाचणीत मिळालेल्या गुणांची माहिती जिल्हा पोलीस दलाचे वेब साइड www.sindhudurgpolice.gov.in वर प्रसिध्दी करण्यात आलेली आहे.
जिल्हयात पोलीस शिपाई पदासाठी पदविधर व उच्च शिक्षित तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यामध्ये सायन्स शाखेचे पदविधर, कम्प्युटर सायन्स, कला शाखा पदवीधर, वाणिज्य शाखा, पदवीधर, पदव्युत्तर वेगवेगळ्या अन्य शाखामधील पदवी उमेदवार, अशा उच्च शिक्षित तरुणांची पोलीस भरतीमध्ये उपस्थिती दिसून आली. अशाप्रकारे उच्च विद्याविभुषीत उमेदवार पोलीस खात्यामध्ये आल्याने पोलीस दलाचा दर्जा उंचवण्यास नक्कीच मदत होईल.