
कुडाळ : वाडोस येथील जत्रोत्सवाच्या परिसरात जुगार खेळल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई कुडाळ पोलिसांकडून करण्यात आली. सिंकदर अबूबकर शहा वैद्य (वय २२, रा. बाहेरचावाडा-सावंतवाडी) व अफजल इस्माईल जल्लर (वय ५८, रा. मुस्लिमवाडी-पिंगुळी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर अंधाराचा फायदा घेऊन काहीजण पळून जाण्यास यशस्वी झाले. ही कारवाई कुडाळ पोलीस ठाण्याचे निरिक्षक रूणाल मुल्ला यांच्यासह पथकाकडून करण्यात आली. काहीजण वाडोस या ठिकाणी सुरू असलेल्या जत्रोत्सवाच्या परिसरात अंदर-बाहर जुगार खेळत असल्याची माहिती अज्ञाकडून देण्यात आली होती. त्यानुसार हा छापा टाकण्यात आला. यात ६ हजार १२५ रुपयाचा रोकड व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.