कणकवलीत दारू अड्ड्यांवर पोलिसांची धाड..!

Edited by:
Published on: September 07, 2023 20:33 PM
views 1388  views

कणकवली : कणकवली शहरातील दोन दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने धाड टाकली आहे. त्यामध्ये दहा ते बारा हजाराचा दारू साठा जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत. अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषाखा पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  शेळके, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू जामसांडेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण देसाई ,पोलीस हेड कॉन्स्टेबल बसत्याव डिसोझा या पथकाने कणकवली शहरात दोन दारू अड्ड्यांवर धाड टाकली. त्यामध्ये दहा ते बारा हजाराचा गोवा बनावटीच्या दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली असून पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.