
दोडामार्ग : सन 2023 ते 24 महसूल विभागाच्या धोरण उदिश्टा प्रमाणे उत्कृष्ट काम करून शासनाची प्रतिमा उंचवणाऱ्यास हातभार लावल्या बद्दल महसूल दिनांनिमित्त आवाडे येथील पोलीस पाटील प्रकाश महादेव देसाई यांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
दोडामार्ग तालुक्यातील आवाडेगावचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत असलेले प्रकाश देसाई यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ व्यवस्थित रित्या संभाळल्यामुळे त्यांच्या या त्यांच्या कामाचा आज येथील सावंतवाडी तहसीलदर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. या त्यांच्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.