पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी स्वीकारला पदभार

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 25, 2025 21:14 PM
views 39  views

कणकवली : पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी आज सायंकाळी कणकवली पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्याकडून स्वीकारला. कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची मालवण पोलीस ठाणे प्रभारी पदी बदली झाली आहे. तर जिल्हा मुख्यालय येथे नियुक्त असलेले पीआय अतुल जाधव यांची कणकवली पोलीस निरीक्षक पदी बदली झाली होती.

आज सायंकाळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी कणकवली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. तर पोलीस निरीक्षक मारुती जगताप याना मालवण पोलीस निरीक्षक पदी बदली झाल्याबद्दल कणकवली पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.