
कणकवली : कणकवली रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएस च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ५.३०वा.च्या दरम्यान केली आहे. साथी अतुल माझी ( वय ३२, रा. कल्याण ईस्ट, मुंबई मूळ रा. लेबु खाली ता. डोगरी, जिल्हा ढाका बांगलादेश), लिझा रहीम शेख (वय २८, सध्या रा. बी विंग मेरिडियन गोल्ड सोसायटी, हडपसर पुणे, मूळ रा. ढाका बांगलादेश) अशी दोन्ही महिलांची नावे आहेत.
कणकवलीत परदेशी महिला असल्याची खात्रीशीर माहिती एटीएस पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने मध्यरात्री ३ वाजल्यापासून कणकवलीत सापळा लावला होता. कणकवली पोलीस व एटीएस पथकाने रेल्वेस्थानकावर त्या पद्धतीने बंदोबस्त ठेवला होता. बुधवारी सायंकाळी ५.३०च्या दरम्यान सदर दोन महीला रेल्वे स्थानकावर आल्या. त्या दोन्ही महिलांची तपासणी केली असता भारतीय अधिवसाचे कोणतेही कागदपत्र आढळले नाहीत. तसेच याबाबतची गोपनीय यामध्ये स्थानकावर आलेल्या दोन्ही बांगलादेशी महिलांची तपासणी केली असता भारतीय अधिवसाचे कोणतेही कागदपत्र आढळले नाहीत. त्यांना पोलीस स्थानकात आणले असता त्या मुळ बांगलादेश मधील राहणाऱ्या असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार त्यांच्यावर विदेशी पारपत्र कलम १४ अ, पारपत्र १९५० नियम ३ अ६ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एटीएस पथकातील पीएसआय सुखदेव शेवाळे, ए एस आय उन्मेष पेडणेकर, पोलीस नाईक रोहन चंद्रकांत सावंत यांच्यासह कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रुपेश गुरव, अंमलदार किरण मेथे, महिला अंमलदार सुप्रिया भागवत यांनी केली.