उपजिल्हा रुग्णालय परिसरात पोलीस तैनात | राजू मसुरकर यांची माहिती

Edited by: विनायक गावस
Published on: November 13, 2023 19:03 PM
views 155  views

सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात डॉक्टर व सुरक्षा रक्षकां सोबत काही लोक रात्रीच्या वेळी हुज्जत घालतात त्यामुळे याबाबत सावंतवाडी वैद्यकीय अधिक्षकांनी याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्याचे लक्ष वेधून उपजिल्हा रुग्णालय परिसरात एक पोलीस सुरक्षा ठेवण्याची मागणी केली होती ती मागणी लक्षात घेता आता उपजिल्हा रुग्णालय परिसरात एक पोलीस ठेवण्यात येणार आहे याबाबतची माहिती जीवन रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी आज येथे दिली.

आठवड्याभरापूर्वी रात्रीच्या वेळेस काही युवकांनी  उपजिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षका सोबत हुज्जत घालून त्याला महाराण केली होती. त्यात तो गंभीर दुखापत झाला होता त्यामुळे असे प्रकार पुन्हा होऊ नये त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याचे लक्ष वेधून एक पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी नेमण्यात यावा अशी मागणी केली होती, ती मागणी लक्षात घेता आज पासून त्या ठिकाणी एक पोलीस ठेवण्यात येणार असल्याचे मसुरकर यांनी यावेळी सांगितले.