
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस सेवेत असलेल्या सात पोलीस उपनिरीक्षकांची पोलीस निरीक्षक पदी बढती झाली आहे. या सातही पोलीस उपनिरीक्षकांचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी अभिनंदन केले व त्यांना नियुक्त प्रदान केल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागातील या सात जणांच्या बढत्या झाल्यामुळे पोलीस विभागात आनंदाचे वातावरण असून सिंधुदुर्ग नगरी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पेढे वाटून याचा आनंद उत्सव साजरा केला.
पोलीस विभागात गेले बरेच वर्ष कार्यरत असलेले आणि चांगले काम असलेले अशा सात पोलीस अधिकाऱ्यांच्या बढत्या झाल्या आहेत. यात प्रशांत जाधव वेंगुर्ले, श्रीकांत इंगवले सावंतवाडी, विकास बडवे बांदा, जयेश ठाकूर निवती, सुनील जाधव आचरा, मनोज पाटील कणकवली व मनोज सोनवलकर विजयदुर्ग यांचा समावेश आहे.