मोबाईल वापसीमध्ये पोलीस शिपाई प्रशांत कासले यांची दमदार कामगिरी !

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 01, 2024 08:16 AM
views 240  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चोरीला गेलेले तसेच हरवलेले मोबाईल पुन्हा त्यां ग्राहकांना मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी मोठे यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मोबाईल वापसी बुधवारी कार्यक्रमांमध्ये लोकांचे चोरीस गेलेले तसेच हरवलेले मोबाईल यांचा शोध घेऊन ते परत मूळ मालकाला पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते देण्यात आले. त्यामध्ये कणकवली तालुक्यात सर्वाधिक जास्त मोबाईल धारकांना पोलिसांनी मोबाईल परत मिळवून दिले आहेत. 

कणकवली पोलीस ठाणे मार्फतीने एकूण 11 मोबाईल फोन मूळ मालकांना परत देण्यात आले.महत्वाची गोष्ट अशी की, हे सर्व 11 फोन कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रशांत कासले याने भारतातील वेगवेगळ्या ठिकाणावरून जसे लखनऊ,मुंबई,कोल्हापूर, सावंतवाडी,कणकवली, वैभववाडी,मालवण असे शोध घेऊन ते परत मिळवलेले होते. सदरचे सर्व 11 मोबाईल फोन हे पोलीस शिपाई प्रशांत कसले यांनी चालू महिन्यात जानेवारी महिन्यात शोध घेऊन ताब्यात घेतलेले आहेत.

त्याबाबत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी प्रशांत कासले याला प्रशस्तीपत्रक देऊन त्याचे अभिनंदन केले. तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी देखील त्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.