मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज..!

Edited by:
Published on: September 01, 2023 20:01 PM
views 58  views

जालना : २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

 आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला.जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये रेटारेटी झाली आहे. मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी उपोषण सुरू होते. त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला. उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याला सुरुवात झाली. या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळी दगडांचा खचही असल्याचे दिसून आले आहे.

उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात मराठा समाजाच्या आंदोलकांनी आक्रमक होत काही गाड्यांच्या काचा फोडल्या तर बसही जाळल्या आहेत.पोलीसांनी जोरदार लाठीचार्ज केला आहे. दरम्यान घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे  खासदार संजय राऊत आणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे तर यावर मुख्यमंत्री यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी लोकांना शांततेचे आवाहन केला आहे. तर मराठा समाजाने मराठा आरक्षण सरकारला चिरडून टाकायचे आहे  त्यामुळेच पोलिसांकरवी हा लाठीचार्ज केल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ माजली आहे.दरम्यान ह्या घटनेचे पडसाद जालन्यात उमटत आहेत.