विषबाधा प्रकरण | ७ जणांवर गुन्हा

Edited by: विनायक गावस
Published on: March 10, 2024 13:29 PM
views 86  views

सावंतवाडी : सांगेली नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याप्रकरणी जेवण पुरवणारा ठेेकेदार आणि कर्मचारी अशा ७ जणांवर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे  अशी माहिती सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांनी दिली. सांगेली नवोदय विद्यालयातील सुमारे १५५ मुलांना अन्नातून विषबाधा झाली होती. ही घटना गुरूवारी रात्री घडली होती. त्यांना शुक्रवारी सकाळी सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यातील ४९ विद्यार्थ्यांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सद्यस्थितीत एकुण २० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.