
कणकवली : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सौ. इं. द. वर्दम हायस्कूल पोईपच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश प्राप्त केले आहे. प्रशालेचे सहा विद्यार्थी गुणवत्ता चमकले आहेत. अथर्व विठोबा माधव, अथर्व मंगेश मेस्त्री, रोहन राजेंद्र धारपवार, सायली प्रकाश पाताडे, संचिता दिपक मसदेकर, चित्रा लक्ष्मण परब हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. एन. कुंभार, संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर, सर्व संस्थापदाधिकारी, शिक्षक, पालक व दशक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.