सावंतवाडी : चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी प्रकाशन संस्थेच्यावतीने नवोदित कवयित्रींसाठी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा - सिंधुदुर्ग-गोवा मर्यादित नवोदित कवयित्रींसाठी आहे. या संस्थेच्यावतीने गेली ४२ वर्षे 'आरती' मासिक प्रकाशित केले जाते. स्पर्धेत १८ वर्षांवरील महिला युवती सहभाग घेऊ शकतात. पहिल्या तीन यशस्वी स्पर्धकांना निमंत्रितांसोबत संमेलनात आपली कविता सादर करण्याची संधी दिली जाईल. यशस्वी कवयित्रींना रोख रक्कम, प्रमाणपत्र, ग्रंथभेट देऊन संमेलनात गौरविण्यात येणार आहे. स्वहस्ताक्षरात किंवा टंकलेखन करून कविता पाठवावी. अंतिम मुदत १० जानेवारी २०२४ पर्यंत आहे. कविता पाठविण्यासाठी संपर्क उषा परब, स्नेहांकुर, सर्वोदय नगर, ता. सावंतवाडी, मो. नं ९४२३८१८८२८. स्पर्धेत जास्तीत जास्त नवोदित कवयित्रींनी भाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, उपाध्यक्षा उषा परब, प्रभाकर भागवत यांनी केले आहे.