
सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीच्या वतीने उद्या शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी प्रथम कोजागरी कवी संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी तथा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक वाय. पी. नाईक यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन उद्या सायंकाळी चार ते पाच या वेळेत सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे. तरी साहित्यप्रेमी आणि कवींनी सहभागी व्हावे, असे कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत आणि सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी कळविले आहे.
'हे' निमंत्रित कवी सादर करणार आपली काव्य प्रतिभा
मालवणी कवी दादा मडकईकर, उषा परब, दीपक पटेकर, विठ्ठल कदम, प्रज्ञा मांतोडकर, ऋतुजा सावंत - भोसले, मनोहर परब, स्वप्ना गोवेकर, मंगल नाईक, प्रा.रुपेश पाटील, अनिल कांबळे, एकनाथ कांबळे, वाय.पी नाईक, प्रा. श्वेतल परब, प्रा.करवेकर, मंगला चव्हाण, प्रा. प्रतिभा चव्हाण आणि अन्य. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही कवीला या संमेलनात सहभागी व्हायचे असेल तर कवी विठ्ठल कदम (9823048126) यांना संपर्क करण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे.