
कणकवली : कणकवलीतील प्रतिभावंत लेखिका, कवयित्री कल्पना मलये यांच्या 'समज - उमज' या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, १२ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वा. कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
'समज -उमज'चे प्रकाशन ज्येष्ठ कवी किरण येले यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ साहित्यिक उषा परब सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अनुजा जोशी, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, ज्येष्ठ लेखिका रश्मी कशेळकर, ज्येष्ठ कवी मोहन शिरसाट आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कवयित्री तथा गायिका रुपाली कदम, अस्मि जोईल या 'समज - उमज'मधील कवितांचे सादरीकरण करणार आहेत. सूत्रसंचालन राजेश कदम करणार आहेत. साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन निमंत्रक अॅड. समृद्धी जैतापकर (९६७३४३८२३९) यांनी केले आहे










