आजगाव येथे 'कवितेचा दीपक' शीर्षकाखाली कार्यक्रमात कवी दीपक पटेकर निमंत्रित!

साहित्य कट्ट्याचा अठ्ठाविसावा मासिक कार्यक्रम
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 17, 2023 14:36 PM
views 146  views

सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा अठ्ठाविसावा मासिक कार्यक्रम रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आजगाव वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.  

       'कवितेचा दीपक' या शीर्षकाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध कवी दीपक पटेकर यांना निमंत्रित केले आहे.

       'दीपी' या टोपणनावाने लिहिणारे दीपक पटेकर हे  कवी, लेखक, परीक्षक व संपादक असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व असून या कार्यक्रमात त्यांच्याशी साहित्यिक गप्पा होणार आहेत. यावेळी त्यांच्या कविताही ते सादर करणार आहेत. तसेच त्यांचा काव्यप्रवासही ते उलगडून  दाखवणार आहेत.  

     तरी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आणि साहित्यचर्चा करणेसाठी सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.