
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत (PMGSY) चालू असलेल्या कामांची पूर्तता प्राधान्याने पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली.ग्रामविकासमंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीला मान्यता देत ग्रामविकासमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले.या बैठकीला प्रधान सचिव (ग्रामविकास व पंचायत राज),सचिव पंतप्रधान ग्रामसडक योजना, व अन्य अधिकारी उपस्थीत होते.
या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत चालू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेऊन प्रस्तावित कामांच्या मंजुरीचा ही आढावा घेण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा मोठा जोर असतो त्यामुळे पावसाळ्यापूर्वी चालू असलेल्या कामांचा वेग वाढवण्यात यावा अशी प्रमुख मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी केली.या मागणीला मान्यता देत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पालकमंत्री राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या ग्रामविकासमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत तात्काळ योग्यती कार्यवाही करण्याची मागणी केली.