PM मोदी हॅट्रिक पूर्ण करतील : नारायण राणे

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 22, 2024 12:47 PM
views 272  views

कुडाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅट्रिक पूर्ण करतील, आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ते मोडतील तर सर्वाधिक खासदार निवडून येतील असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी सिंधुदुर्ग नगरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तर विरोधकांवर टीका करताना काही विक्षिप्त माणसं असतात त्यांना चांगलं पहावत नाही, त्यांना चांगल्या वातावरणात राहायची सवय नाही, हा विरोध राजकीय असून द्वेषापोटी असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग नगरी येथे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील प्रतिष्ठापनेचा लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी भाजप नेते निलेश राणे,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, रणजीत देसाई, राजू राऊळ, दीपलक्ष्मी पडते, नगरसेवक प्राजक्ता बांदेकर, आदी उपस्थित होते.


यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित होत आहे. याचा आनंद आहे या क्षणाची वाढ आणि वर्ष भारतीय हिंदू पाहत होते आणि त्याची पूर्तता आज होत असताना सगळे आनंदमय आहेत समाधानी आहेत आणि म्हणून देशात सर्वत्र आनंदी आनंद वातावरण आहे. मीही प्रत्यक्षात काही दिवसात दर्शन घेईल असे यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. 


आपण काही प्रभू रामचंद्रांकडे मागितलं का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता. प्रभू रामचंद्रांसह देवतांनी मला सर्वकाही दिल आहे. मागण्यासाठी शिल्लक काही नसल्यामुळे मी फक्त नमस्कार करून आशीर्वाद कायम ठेव देवा एवढंच मागितलं असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.