तंबाखू मुक्तीची शपथ !

ग्रामीण रूग्णालय दोडामार्गात कार्यक्रम
Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 31, 2024 09:42 AM
views 434  views

दोडामार्ग : ग्रामीण रूग्णालय दोडामार्ग येथे राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व ग्रामीण रूग्णालय दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये उपस्थीत रुग्ण यांना समुपदेशन करण्यात आले. 

तंबाखू पदार्थांचे सेवन न करण्याची शपथ घेतली व सहा महिने पाठपुरावानंतर ज्या रुग्णांनी तंबाखू सेवन न केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना सदर कार्यक्रमात तंबाखू मुक्त रुग्णाचा वैद्यकीय अधीक्षक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमांत वैद्यकीय अधिकारी डॉ अनिकेत गुरव, डॉ रामदास रेडकर व अधीपरीचारीका सुरेखा भणगे यांनी मार्गदर्शन केले. व उपस्थित कर्मचाऱ्यांना मुखकर्करोग, तंबाखू दुष्परिणाम व होणारे आजार याविषयी मार्गदर्शन केले. तसेच स्टाफ नर्स तेजस्विनी कसालकर यांनी मौखिक तपासणी केली. समुपदेशक सचिन मोहिते यांनी समुपदेशन केले. व तंबाखू मुक्तीची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी ग्रामीण रूग्णालय दोडामार्ग येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.